राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वती...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक,सांस्कृतिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही नवरात्रोत्सव निमित्तान ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या निमित्तान स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तर देवी भक्तांसाठी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले येते. यंदाही २१ व्या वर्षी नऊ दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. देवीची प्रतिस्थापना व घटस्थापना देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील, उद्योजक श्रीकांत चांडक आदींच्या हस्ते संपन्न होणार आहे. सोमवार १२ रोजी सायं ५ वा. आंबिकानगर येथील आराध्या मंडळाच्या वतीने देवी गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
मंगळवारी १३ रोजी रात्री ९ वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, बुधवार १४ रोजी जिजाऊंच्या लेकी हा महिला व तरुणींसाठी अनोखा कार्यक्रम, गुरुवार १५ रोजी संगीत खुर्ची , शुक्रवार १६ रोजी सबसे बडा कलाकार नाट्य आविष्कार व पुणे येथील कौशिक कुलकर्णी प्रस्तूत वऱ्हाड निघालंय लंडनला नाटक सादरीकरण, शनिवार १७ रोजी चित्रकला व रंगभरण स्पर्धा व नृत्य स्पर्धा, रविवार १८ रोजी रांगोळी व नृत्य स्पर्धा, सोमवार १९ रोजी होमहवन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
नवरात्र काळात पार पडणाऱ्या स्पर्धांसाठी विविध मान्यवर,देणगीदार यांचे सहकार्य लाभणार आहे.तरी या कार्यक्रमांसाठी परिसरातील भाविक व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत