उंबरे : प्रतिनिधी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या हा खरा मूलभूत प्रश्न आहे. दररोज हंडा घेऊन वणवण करणाऱ्या महिला भगिनीच्या व्यथा सोडविण्...
उंबरे : प्रतिनिधी
गावात पिण्याच्या पाण्याची समस्या हा खरा मूलभूत प्रश्न आहे. दररोज हंडा घेऊन वणवण करणाऱ्या महिला भगिनीच्या व्यथा सोडविण्यासाठीच मी ग्रामपंचायत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.गावचा सर्वांगिण विकास आणि माझ्या महिला भगिनींची डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम आपण प्राधान्याने करणार असल्याची ग्वाही ज्योती गोरक्षनाथ ढोकणे यांनी दिली. ढोकणे म्हणाल्या, गावात यापूर्वीही चांगली कामे झाली आहेत, मात्र अजूनही पिण्याच्या पाण्यासारखा प्रश्न प्रलंबित आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये नेहमीच पाण्याची समस्या भेडसावत असते. माझ्या मायमाऊलीला पाण्यासाठी वणवण फिरताना मी पाहिले आहे, ज्यावेळी सोनई पाणी योजना बंद असते त्यावेळी महिलांची हंडाभर पाण्यासाठी होणारी हेळसांड मी स्वतः अनुभवली आहे. त्यामुळे महिलांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी मी पाच मधून निवडणूक लढणार आहे. छत्रपती प्रतिष्ठानकडून माझी उभी राहण्याची तयारी असली तरीही अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही, मात्र, निवडणूक लढवणार हे नक्की. आगामी काळात जनतेने संधी दिल्यास येथील शिक्षण व्यवस्था, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा या बाबीवर मी काम करणार आहे, यातून प्रभाग पाच हा गावसाठीं नव्हे तर तालुक्यासाठी एक व्हिजन म्हणून समोर आणण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

👌👌👌👌
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवा