ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून घरात आढळल्या मृतावस्थेत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सून घरात आढळल्या मृतावस्थेत

  अहमदनगर(वेबटीम) ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी सौ. ...

 अहमदनगर(वेबटीम)


ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी सौ. गौरी प्रशांत गडाख यांचा अहमदनगर येथील त्यांच्या राहत्या घरी मृतदेह आढल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती समजताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. 


दरम्यान गौरी गडाख यांनी आत्महत्या केल्याचे माहिती मिळत आहे. घटनेप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

मयत गौरी ह्या लोणी(ता.राहाता) येथील वसंतराव विखे यांच्या कन्या होत.

1 टिप्पणी