देवळाली प्रवरा(वेबटीम) जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले आज देवळाली प्रवरात कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे असल्याचे समजताच देवळा...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले आज देवळाली प्रवरात कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे असल्याचे समजताच देवळाली प्रवरा नगरपालिका अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे होऊन विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले आज सायंकाळी ६ वाजेनंतर श्रीरामपुरहून देवळाली प्रवरात बंद असलेले कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे समजताच देवळाली नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने ऍक्शन मोडमध्ये येऊन विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली. नगरपालिकेचा एक कर्मचारी तोंड पाहून नेहमीप्रमाणे कारवाई करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने या मोहिमेत सहभागी होत मोठ्या प्रमाणात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
दरम्यान दररोज तसेच आठवडे बाजारात विनामास्क फिरणारे अनेक जण बिनधास्त फिरत असताना नगरपालिका कारवाई करताना दिसून आली नाही. मात्र आज जिल्हाधिकारी देवळाली प्रवरात येणार म्हंटल्यावर नगरपालिकेने कारवाई सुरू केल्याची चर्चा सुरू होती.


कारवाई केली तरी बोबला नाही केली तरी बोबला कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा
उत्तर द्याहटवा