कोपरगाव/प्रतिनिधी:- शहरातील बाजारतळ येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका नावाचा हार-जीतचा अवैधरित्या जुगार खेळताना पोलिसांनी छापा मारत...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
शहरातील बाजारतळ येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका नावाचा हार-जीतचा अवैधरित्या जुगार खेळताना पोलिसांनी छापा मारत एकास पकडले. सदर कारवाई शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता.१७) दुपारी ३ वाजेच्या सुमारास केली. या धडक कारवाईने अवैध धंदे चालकांत खळबळ उडाली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बाजारतळ येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अन्सार रहमान सय्यद (वय ३४, रा.लक्ष्मीनगर) यास अवैधरित्या कल्याण मटका नावाचा हार-जीतचा जुगार खेळताना पकडले. त्याच्याकडून ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी राम खारतोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुरनं.२८७/२०२१ मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोरेकर हे करत आहे.
970 Rupees???😂😂😂
उत्तर द्याहटवाVery big raid it seems... police should be awarded medals for it