सात्रळ/वेबटीम:- सात्रळ-रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयाने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश स...
सात्रळ/वेबटीम:-
सात्रळ-रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयाने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेस इ.
८ वी चे विद्यार्थी प्रविष्ट होतात.सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात विद्यालयातील ४७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.त्यापैकी ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ४ विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले आहे.त्यामध्ये-१.अंत्रे ओमकार ज्ञानेश्वर २.दिघे ओम अरुण ३. हारदे कृष्णा अण्णासाहेब ४.कोहकडे कुणाल चंद्रकांत हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विभागप्रमुख श्री.व्ही.बी.गभाले,विषयशिक्षक श्री. पी.बी.कुलथे, श्री.एस.एस झावरे,श्री.दिघे.एस.डी श्री.बी.डी.कोहकडे,श्रीम.फरकाडे पी.डब्ल्यु व श्री.थोरात डी.एस यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे प्राचार्य श्री.अशोकराव वानखेडे सर व पर्यवेक्षक सिताराम बिडगर सर यांनी अभिनंदन केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातून पात्र ठरलेले विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष मा.अरुण कडू पाटील, उत्तरविभागीय अध्यक्ष मा.आ.आशुतोषजी काळेसाहेब,विभागीयअधिकारी श्री.कण्हेरकर सर सहाय्यक विभागीय अधिकारी श्री.वाळुंजकर सर आणि श्री.तापकीर सर, स्कूल कमिटी सदस्य,अॅड.विजयराव कडू पाटील, संभाजीराव चोरमुंगे पाटील, बबनराव कडू,भास्करराव फणसे, किशोर भांड डॉ.बोरा, युवा नेते किरण कडू , पंकज कडू, विक्रांत कडू, गणेश कडू,भाऊसाहेब पेटकर, सर्व ग्रामस्थ पालक, व शिक्षणप्रेमी मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
Congratulations
उत्तर द्याहटवा