बुधवारपेठ एक वास्तव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बुधवारपेठ एक वास्तव

  पुण्यामध्ये आल्यापासून मला  कायमच अप्पा बळवंत चौकात जाण्याची ओढ लागती. वाचनाची आवड असल्यामुळे तिथं जाऊन पुस्तक विकत घेण म्हणजे माझं खूप मो...




 पुण्यामध्ये आल्यापासून मला  कायमच अप्पा बळवंत चौकात जाण्याची ओढ लागती. वाचनाची आवड असल्यामुळे तिथं जाऊन पुस्तक विकत घेण म्हणजे माझं खूप मोठं सुख.


मी आणि माझी मैत्रीण पुस्तक घेण्यासाठी अप्पा बळवंत  चौकामध्ये निघालो. डोळ्यावरती गुलाबी रंगाचा चष्मा  आणि सगळंच गुलाबी दिसायला लागलं. आम्हाला  लवकर जाण्याच्या घाईने मी गाडी पेठेतून घेतली.

 काही महिला , मुली मेकअप करून  भर उन्हात उभ्या होत्या. माझी मैत्रीण बोलली  अग ह्या मुली का अंग प्रदर्शन करताय. तेव्हा मी तिला बोलली अग आपण वैश्या वस्तीत आलोय वाटतंय. आम्ही तर एकदमच घाबरून गेलो. मी निरीक्षण करत  चालली होती . अचानकपणे आवाज आला ये येतोस का❓ मी एकदम विचलीत झाले. काहींचा चेहरा मेकअप मुळे खराब झाला होता तरीही त्यांचा प्रयत्न होता की मी सुंदर दिसावं मला जास्त गिऱ्हाईक मिळावं.   एकीकडे दोन मुली एका पुरुषाला चप्पलने मारत होत्या. अगदी कमी वयाच्या मुलीही तिथं होत्या. मला ती परिस्थिती खूप भयावह वाटत होती. बुधवार पेठेतून मी कधी बाहेर पडेल असे झाले होते.


 तेवढ्यात माझी मैत्रीण बोलली ह्यांना कष्ट करून खायला काय होत❓ असे काम करणं योग्य आहे का❓कुणाचे संसार मोडन चांगलं आहे का❓ 

मी एकदम शांत होऊन तिचे प्रश्न ऐकत होते. कुठंतरी तिचे विचार चुकताय  हे मला वाटत होते. घरी आल्यानंतर मला सगळी बुधवार पेठच डोळ्यासमोर येत होती आणि तिचे प्रश्न. घेतलेले पुस्तक मी  बाजूला ठेवलं आणि तिच्याशी चर्चा करण्यास सुरुवात केली.


वैश्या आहेत म्हणून भारतात बलात्कार कमी होताय. त्या आहेत म्हणून बाकीच्या स्रीयाची इज्जत जपून आहे. आणि जे पुरुष सेक्सचे भुकेले असता ते जातात त्यांच्याकडे. काही शिकलेल्या नसल्यामुळे किंवा परिस्थिती नसल्यामुळे हे काम करतात.

काहींची इच्छा नसतानाही त्यांना दोन वेळेची पोटाची खळगी भरवण्यासाठी हे काम करावं लागतं.  काय सुख आहे त्यांना त्यांच्या आयुष्यात ना आई-बापच ना कुणाचं. पुरुष फक्त स्वार्थापोटी त्यांचाजवळ येतात. आपलेला झालेलं बाळ हे कुणाचं आहे किंवा त्याचा बाप कोण हे पण त्यांना माहीत नसतं.  त्यांचं आयुष्य म्हणजे एखाद सुकून गेलेलं फुल. 

जातीवाद करण्याला काही फरक नाही पडत की ती स्री आपल्या जातीची आहे की नाही म्हणून. 


2002 साली WHO ने एड्स बद्दल खूप भयंकर इशारे केले होते. 2002 साली दिलेल्या WHO च्या इशार्यात म्हंटल होत की  2010 पर्यंत भारतातील एड्स बधितांची संख्या अडीच कोटी इतकी असेल. प्रतिदिन तब्बल एक हजार लोकांना एड्सची बाधा होईल अस म्हणलं गेलं होतं. भारत हा एड्स कॅपिटल बनून जाईल अशी भीती WHO कडून व्यक्त केली गेली होती. मात्र 2010  येऊन गेले तशी स्थिती भारतात  झाली नाही. पोलिओ निर्मूलनासाठी भारताने राबवलेल्या  धोरणाचा नेहमीच जगभरात गौरव होत राहिला. मात्र एड्सच्या  संसर्गजन्य रोगावर मिळवलेल्या विजयावर अगदी किरकोळ लेखउल्लेख समोर आले.

हे सगळं कुणामुळे शक्य झालं❓ नक्कीच सेक्स वर्कर स्रीयांमुळे...!!!

ह्या महिलांसोबत आणखी एक नाव महत्वाचं होत ते म्हणजे अशोक अलेक्झांडर.

अशोक अलेक्झांडर हे महाराष्टाचे माजी राज्यपाल पी.सी अलेक्झांडर यांचे पुत्र. पीसीनी इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव म्हणूनही काम बघितले होते. एड्सच्या साथीचे जेव्हा इशारे जाहीर केले जाऊ लागले तेव्हा अनेकांच्या पोटात गोळे उठू लागले. यासाठी काहीतरी करायला पाहिजे ह्यावर सगळ्यांनी भर दिला. अशोक  अलेक्झांडर यांनी आपली मोठ्या पगाराची नोकरी सोडून बिल अँड मेलिंडा गेट्स (bill and Melinda gates) फौंडेशनच्या  एड्सविरोधी कंपनीची निवड केली. त्यांनी तब्बल 20 वर्ष यासाठी खर्च केले. या अनुभवावर त्यांनी 'ए स्ट्रेंजेर तृथ: लेसन्स इन लव्ह'(A stranger truth: lesnse) , 'लीडरशिप अँड करेज  फॉर्म इंडियाज सेक्स वर्कर '(Leadership and courage form India's sex worker)हे पुस्तक लिहिले.

हे पुस्तक  वाचतानी आपल्या देशातील वैश्यानी केलेली कमाल लक्षात येते. 

सरकार यंत्रांनी तर साधा त्यांचं नाव पण नाही घेतलं.सर्वसामान्य लोकांना तर त्यांच्या विश्वाशी काही घेणं देणं नाही. त्या मेल्या काय आणि जगल्या काय.

एड्स नावच संकट टळलं  हे ह्या महिलांमुळे असे ठामपणे म्हणता येईल.

वेश्या एकत्र जमल्या आणि वस्ती मध्ये काईन बॉक्स ऐवजी निरोध बॉक्स लावले. जीवपणाला लावून ह्या स्रीयांनी काम केले. त्यांच्या कामच जेवढं कौतुक करावे तेवढे कमीच!!!

एड्स सोडून आणखी संसर्गजन्य रोग असतात तरीही त्या त्यांचं काम  करताय. तरीही आपल्यासारखे लोक त्यांना हिनवतात. संसार मोडणाऱ्या महिला बोलतात. त्यांनी अनेकांचे कुटुंब वाचवले

तेवढ्यात ती बोलली हो ग माझं मत त्यांच्याबद्दल खूपच वाईट होत. कुणीही एवढं वाईट नसत जेवढं आपण त्याला समजतो. सगळी बाजू खोलवर जाऊन बघितली पाहिजे......

                              

मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍🏻

1 टिप्पणी