गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामधील राजकारण सगळ्यांच्या ओठांवरती खेळतंय. प्रत्येक वृत्तवाहिन्यांवर ठाकरे सेना आणि शिंदे सेना ह्यावरती चर...
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामधील राजकारण सगळ्यांच्या ओठांवरती खेळतंय. प्रत्येक वृत्तवाहिन्यांवर ठाकरे सेना आणि शिंदे सेना ह्यावरती चर्चा रंगत आहे. सध्याच्या राजकीय पटलावर जी काही ओढाताण सुरु आहे ती अतिशय अशोभनीय आणि लाज्जस्पद आहे महाराष्ट्रासाठी!!!
महाराष्ट्राला अनेक इतिहासकारांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यात शाहू, फुले आंबेडकर यांचे खूप मोठे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते आजही त्यांचं नाव आपण गर्वाने घेतो. त्यांच्यातील एकतरी गुण आपल्याना राजकीय नेत्यांमध्ये आढळतो का?
जो तो सत्तेचा लालसी झाला आहे . जनतेने तुम्हाला जनतेच्या हितासाठी निवडून दिले आहे. हे सगळं राजकीय नेते निवडून आल्यावर विसरून जातात. आजच्या स्थितीला बघता राजकीय नेत्यांनी लोकशाहीची व्याख्याच बदलून टाकली आहे. राजकीय नेत्यांनी राजकीय नेत्यांच्या हितासाठी स्थापित केलेलं राज्य म्हणजे लोकशाही; असेही म्हणता येईल!!!!
गेल्या 8 ते 10 दिवसापासून बंडखोर आमदार महाराष्टाच्या बाहेर आहे. त्यांच्या काही मागण्या आहेत त्या बाहेर राहून मान्य होइल अस त्यांना वाटत.
त्याच जर मागण्या निधड्या छातीने पुढे जाऊन मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या असत्या तर आज मुंबई-सुरत-गुवाहाटी- गोवा याची वारी टळली असती.
बंडखोर आमदारांवरती केला जाणार खर्च, त्यांना दिलेले संरक्षण हे खरंच योग्य आहे का?
महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मेले आहे आणि अजूनही मरत आहे. त्यांच्या मालाला अजूनही हमीभाव मिळत नाही. त्यांचा विचार राजकीय नेत्यांनी केला आहे का?
बेरोजगारी खूप प्रमाणात वाढली आहे. कित्येक पदवीधर तरुण आज बेरोजगार आहेत. तरुण नोकरीसाठी वणवण फिरताय त्यांच्या बद्दल कुणीही चर्चा करत नाही किंवा वृत्तवाहिन्यांवर दाखवत नाही.
रोज चोरी,रेप, घातपात काहींना काही होत असते पण त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही.
महाराष्टाच्या विकासच बाजूला राहील आणि सत्ता कशी मिळेल किंबहुना कशी टिकवता येईल यातच सगळं राजकीय मंडळी व्यस्त आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बंडखोर आमदारांचा एक व्हिडिओ समोर आला. अक्षरशः जमिनीवर बसून नाचत होते आणि हे लोक बोलताय आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राचे भले करणार आहोत. ही गोष्ट कुठंतरी रुतत आहे आणि हास्यस्पद आहे.
जातीवाद ,मंदिरं , मस्जिद ह्यावरून राजकारण करून सत्ता कशी मिळवता येईल हेच विचार राजकीय नेत्याच्या डोक्यात चालू असतात.
जे समाजासाठी तन, मन देऊन काम करत त्याला इतिहास आठवणींमध्ये ठेवतो.
जेवढ्या बैठकी आज सत्तेसाठी होत आहे तेवढ्याच जर महाराष्टाच्या विकासासाठी घेतल्या असत्या तर आज महाराष्ट्र वेगळाच असता...
समर्पण हा समाजकारणाचा केंद्रबिंदू असेल तरच खऱ्या अर्थाने समाजकार्य होऊ शकत; एकाधिकारशाही केव्हाही कुठल्याही संस्था अथवा चळवळीला मोठी करू शकत नाही....!!!!!!
मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍🏻✍🏻
सगळी तरफड त्या खुर्ची साठी चालली आहे..पण त्या खुर्चीवर बसून त्यांना महाराष्ट्र चालवायचा आहे हे ते विसरले आहे.. politics फक्त त्यांच्यात नाही तर ते गरीब जनतेसोबत खेळत आहेत. जनता यांना vote देते विश्वासाने, राजा बनवते पण ते त्या लायक आहेत का?
उत्तर द्याहटवा